शिंदवड गावाची माहिती
शिंदवड एक दृष्टीक्षेपः आरत हा खेड्याचा देश आहे असे म्हटले जाते. लाखो खेड़ी आपल्या देशात आहेत व लाखोच्या संख्येने असूनही प्रत्येक खेडे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रातील असेच एक वैशिष्ट्यपूर्ण गाव म्हणजे शिंदवड. हे गाव नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असून दिंडोरी तालुक्याच्या पूर्व सीमेवर चांदवड तालुक्याच्या सीगेलगत आहे. निसर्गाने भरभरून दिलेले हे दुमदार गाद. गावाच्या उत्तरेला टेकड्याच्या रांगा असून गर्द वनराईने सजलेल्या आहेत.
गावची लोकसंख्या सुमारे २५०० इतकी असून विविध जातीपातीचे लोक गावात गुण्यागोविंदाने राहतात. सुमारे ८५ टक्या पेक्षा जास्त लोक साक्षर असून शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. गावात सुमारे ४५५ कुटुंब कायम वास्तव्य करून राहत आहेत. द्राक्ष, टोमेटो, गहू, कांदा ही गावातील प्रमुख पिके आहेत. गावात उच्चशिक्षित लोकांचे प्रमाणही चांगले आहे.
मुबई नाशिक महामार्गापासून साधारणतः किमी अंतरावर गाव वसलेले आहे. गावापासून जवळच सप्तश्रृंगी गड है तीर्थक्षेत्र आहे. गावातील लोक उत्सवप्रिय असून गावात रत्नगड हे खंडोबाचे प्रशिद्ध तीर्थक्षेत्र आहे. तसेच संत श्री जिवनेश्वर काळूबाबा यांचा आश्रम आहे. स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र दिंडोरीचे संस्थापक श्री गोरे दादा यांची शिंदवड हीच जन्भूमी आहे.
प्रतिजेजुरी श्रीक्षेत्र रत्नगडः शिंदवड गावातशक्वाकर डोंगरावर खंडेरायाचे प्राचीन तीर्थक्षेत्र असून तो डोंगर रत्नगड था नावानेच प्रसिद्ध आहे. दर चैत्र पोर्णिमा व चंपाषष्टीला रत्नगडावर मोठा यात्रोत्सव असतो. पंचक्रोशीतील लाखो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. शिंदवड गावातील लोक कधीच जेजुरीला जात नाहीत शिवाय पंचक्रोशीतील जे आविक जेजुरीला आऊ शकत नाहीत. ते सर्वजण रत्नगड येथे येत असतात. त्यामुळे रत्नगड हे देवस्थान “प्रतिजेजुरी” म्हणूनच ओळखले जाते. गडाच्या टोकावर खंडेरायाचे मंदिर असून मंदीर बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य ग्रामस्थांनी खांद्यावरून वाहून तिथपर्यंत पोहचवले आहे. रत्नगडचा खंडोबा नवसाला पावतो अशी लोकांची श्रद्धा असून दर रविवारीही गडावर भाविकांची मोठी गर्दी असते.
यात्रेचे स्वरूप वर्षातून दोनवेळा गडावर यात्रा भरते त्यापैकी चैत्रपोर्णिमेला यात्रेपूर्वी नवरात्रीचा उपवास केला जातो. यात्रेच्या दिवशी पहाटे पासूनच लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येत असतात यात्रा एकच दिवसाची असल्याने प्रचंड गर्दी होत असते. रात्री २ वाजेपर्यंत भाविकांची गर्दी सुरूच असते. यात्रेच्या दिवशी दुपारी बारा वाजता गावातून वाजत रथाची मिरवणूक काढली जाते व दुपारी तीन वाजेपर्यंत मिरवणूक रत्नगडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो असे यात्रेचे सर्वसाधारण स्वरूप असते.
रत्नगड देवस्थानचे उपक्रम रत्नगड येथील मंदीर हे अतिशय पुरातन झाले होते त्यामुळे लोकवर्गणीतून भव्य असे नवीन मंदीर उभारले आहे.
रत्नगाच्या परिसरात ग्रामस्थ व सेवाभावी संस्थांच्या मदतीने महाराष्ट्र राज्य शतकोटी वृक्षलागवड योजनेस भरभरून प्रतिसाद देण्यात आला असून अनेक दुर्मिळ प्रजातीचे हजारो वृक्ष परिसरात लावण्यात आले असून त्यांची देखभाल केली जात आहे. माळरानाची खडकाळ जमीन असतानाही ग्रामस्थांनी व मल्हारी मार्तड सेवेकऱ्यानी रोपासाठी लोकवर्गणीतून ठिबक सिंचन उपलब्ध करून दिले व वृक्षांची जोपासना केली आहे. शिवाय गडावर जाण्यायेण्यासाठीचा मार्ग हा अतिशय बिकट होता. त्यामुळे भाविकांचे प्रचंड हाल होत असत. समाजसहभागातून व काही दानशूर व्यक्तीच्या मदतीने घाटपायऱ्या बांधण्याचे कार्य हाती घेण्यात आले काही प्रमाणात घाट पायऱ्या बांधण्यात आल्या असून पुरेशा निधी अभावी काम अपूर्ण अवस्थेत आहे ते काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. अपुऱ्या मार्गामुळे यात्रा काळात प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरी सारख्या दुर्घटना होऊ शकतात. अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील पुरातन बारव रत्नगडाच्या पायथ्याशी आहे. जलसंधारण कार्य म्हणून त्यातील गाळ काढून त्यात पुनर्भरण केले जात आहे. त्यापाण्याचा उपयोग वृक्षाकरिता केला जात आहे.
प्रस्तावित गरजा : सध्या अपूर्ण अवस्थेत असणाऱ्या घाट पाय-यांचे बांधकाम पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच रत्नगड परिसरात अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मोकळी जागा शिल्लक असून वृक्षलागवडीला चांगला वाव आहे. येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी पडते. त्यासाठी पिण्याचे व वृक्षाकरिता मुबलक पाण्याची व्यवस्था होणे नितांत गरजेचे आहे. रत्नगड परिसरात पक्क्या रस्त्यांची गरज असून सद्यस्थितीत उपलब्ध असणारे रस्ते अपुरे पडतात. त्यामुळे यात्रा काळात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागलो.